महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर जिल्ह्य़ात गावठाण मोजणीचा नवा उपक्रम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतला आहे. हा उपक्रम म्हणजे जमाबंदीचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या नावाने नवीन पॅटर्न समजला जात आहे. माढा तालुक्यातील उजनी (मा) येथे गावठाण मोजणीचा शुभारंभ भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांच्या हस्ते झाला.
ही गावठाण मोजणी अद्ययावत यंत्रसामग्रीच्या म्हणजे ईटीएस मशीनच्या साह्य़ाने अचूकपणे होणार आहे. गावठाण मोजणीनंतर संबंधित गावक ऱ्यांना सात-बारा उताऱ्याप्रमाणे त्यांच्या मालकीच्या मिळकतीचे उतारे, नकाशे लगेचच उपलब्ध होणार आहेत. भविष्यात मालकीहक्काबाबतच्या जागेची सनद गावक ऱ्यांना या माध्यमातून मिळणार आहे. या उपक्रमाचे उजनीच्या गावक ऱ्यांनी स्वागत केले. गावचे सरपंच ज्ञानेश्वर मोरे यांनी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक वानखेडे यांचा सत्कार केला. भूमी अभिलेख विभागाचे शिरस्तेदार पी. सी. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी भूमी अभिलेख विभागाचे माढा येथील उपअधीक्षक एस. टी. घुले हे उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा