केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर भेटीप्रसंगी त्यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमध्ये गैरहजर आढळलेल्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तिघा डॉक्टरांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
डॉ. सचिन जाधव, डॉ. प्रवीण जाधव व डॉ. अंजली शिवपुजे अशी निलंबित डॉक्टरांची नावे आहेत. गेल्या १४ जानेवारी रोजी सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचा तीन दिवसांचा दौरा आटोपून परत जात होते. त्या वेळी हा आक्षेपार्ह प्रकार आढळून आला होता. सात रस्त्यावरील आपल्या ‘जनवात्सल्य’ बंगल्यातून रेल्वे स्थानकाकडे शिंदे हे गेले. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु त्यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेत नियुक्त तिन्ही डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून आले. या प्रकरणी चौकशी होऊन अखेर संबंधित तिन्ही डॉक्टरांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
सुशीलकुमारांच्या ताफ्यातील गैरहजर तीन डॉक्टर निलंबित
सात रस्त्यावरील आपल्या ‘जनवात्सल्य’ बंगल्यातून रेल्वे स्थानकाकडे शिंदे हे गेले. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु त्यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेत नियुक्त तिन्ही डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून आले.
First published on: 09-02-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushilkumar shinde suspend doctor z