सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे येत्या २३ मार्च रोजी सोलापूरच्या भेटीवर येत असून त्यादिवशी ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक घेऊन केंद्र पुरस्कृत विकास व कल्याणकारी योजनांच्या कामांचा आढावा घेणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांच्या फेब्रुवारीअखेपर्यंत विकासाचा आढावा सुशीलकुमार शिंदे घेतील. यात प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेचे प्रशासन, भूमी अभिलेखांचे संगणकीकरण, राजीव गांधी ग्रामीण विद्युतिकरण योजना, खासदार निधी स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम आदी विकास कामे तथा योजनांच्या कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा