दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या संतोष जालिंदर राऊत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षक पांडुरंग गवारे यांचा मृतदेह अंथरवण पिंप्री शिवारात आढळून आला. शिक्षकाचा मृत्यू की घातपात, याचा शोध पोलीस घेत आहेत. बीड शहरातील क्रांतिनगर भागात राहणाऱ्या संतोष जालिंदर राऊत (वय ४५) यांनी सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. राऊत हे अंबाजोगाई येथील दारूबंदी विभागात कार्यरत होते. आजारपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शहरातील खंडेश्वरी माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले पांडुरंग गवारे (चिंचवडगाव, तालुका वडवणी) मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होते. काल बीड शहरापासून जवळच असलेल्या अंथरवण पिंप्री शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
पोलिसाची आत्महत्या, तर शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू
दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या संतोष जालिंदर राऊत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षक पांडुरंग गवारे यांचा मृतदेह अंथरवण पिंप्री शिवारात आढळून आला.
First published on: 11-12-2012 at 12:32 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suside by police teacher suspicious dead