शाळा न्यायाधिकरणाने गेल्या २२ मार्चला काढलेल्या आदेशाप्रमाणे शहरातील सेंट फ्रान्सिस डिसेल्स हायस्कूलने निलंबित मुख्याध्यापक रेव्ह. फादर पीटर ठमाजी अमोलिक यांना या पदावर रुजू करून घ्यावे, तशी कार्यवाही न झाल्यास शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी आपणाविरूद्ध कार्यवाही होऊ शकते, अशी तंबी जि. प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळेला दिली. दरम्यान, शाळा न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपणास मुख्याध्यापक पदावर रुजू करून घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. पदावर रुजू करून घ्यावे, तसेच थकित निर्वाह भत्ता द्यावा, या मागणीसाठी रेव्ह. फादर पीटर अमोलिक यांनी मंगळवारी (दि. २७) उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
‘निलंबित मुख्याध्यापकास कामावर त्वरित रुजू करावे’
शाळा न्यायाधिकरणाने गेल्या २२ मार्चला काढलेल्या आदेशाप्रमाणे शहरातील सेंट फ्रान्सिस डिसेल्स हायस्कूलने निलंबित मुख्याध्यापक रेव्ह. फादर पीटर ठमाजी अमोलिक यांना या पदावर रुजू करून घ्यावे,
First published on: 25-11-2012 at 12:29 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspended principle order to join immediate duty