शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास संबंधित वसुली लिपिक व कर निरीक्षकांना निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी तंबी महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिली.
आयुक्त सुधीर शंभरकर यांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इमारत भाडे वसुलीबाबत रविवारी आढावा बैठक घेतली. वसुलीबाबत असमाधानकारक उत्तरे आल्याने आयुक्तांनी कडक सूचना दिल्या. प्रभागातील प्रत्येक वसुली लिपिकास दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास वसुली लिपिक, तसेच कर निरीक्षकाची वार्षिक वेतनावाढ थांबविण्यात येईल किंवा निलंबनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. थकबाकीदारांच्या वसुलीसाठी पालिकेने पथक नेमले असून यामध्ये जप्ती अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. दि. १० मार्चपासून या बाबत महापालिका कारवाई करणार आहे. शहरातील नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या तकबाकी कराचा भराणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. कर अधीक्षक एस. बी. नगरसाळे, ए. डी. देशमुख, करनिरीक्षक मुकुंद मस्के, समीयोद्दीन, सी. एल. पवार, पी. ए. अडकीने, बालाजी तिडके, सुवर्णा दिवाण, जलील अहमद खान आदी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा