कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळींनी आपल्या मुलीला गळफास दिल्याची तक्रार सिन्नर येथील राजेंद्र गोळेसर यांनी केल्यानंतर पुण्याजवळील वडगाव शेरी येथील तिघांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
राजेंद्र गोळेसर यांची मुलगी आम्रपाली (२१) हिचा विवाह वडगाव शेरी येथील गौरव जाधव यांच्याशी ६ जानेवारी २०१३ रोजी झाला. गौरव उच्चशिक्षित आहे. गौरवने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी सट्टय़ात कर्जबाजारी झाला.  पत्नीचे दागिने विकून पैसे जमा केले. त्यानंतर आम्रपालीने माहेरहून ५० हजार रुपये आणावेत म्हणून तो छळ करू लागला. आम्रपालीला त्रास देण्यात तिच्या सासू-सासऱ्यांचाही सहभाग होता, असे गोळेसर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आम्रपालीची हत्या झाली त्या वेळी तिचा पती गौरव फ्लॅटमध्येच उपस्थित होता. सासरच्या मंडळींनी आम्रपालीचा प्रथम खून करून नंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव घडवून आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर पती गौरव जाधव (२५), रागिणी जाधव (५२) आणि राजाराम जाधव (५८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी
करावी, अशी मागणी सिन्नरच्या नागरिकांनी केली आहे. आम्रपाली ही सिन्नर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष मु. शं. गोळेसर यांची नात आहे. विवाहानंतर केवळ सात महिन्यांतच आम्रपालीचा
 मृत्यू झाल्याने सिन्नरमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा