येथील बहुचर्चित आदर्श शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निवडीसाठी शनिवारी (दि. ९) मतदान होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया चालू असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने इतर २५४ मतदारांना मतदान करण्याचा अधिकार दिला. यासाठी वेगळय़ा मतपेटय़ांचे आयोजन करण्याचे आदेश देताना निवडणुकीची मतमोजणी न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर करण्यात येईल, असे म्हटले. मात्र, बुधवारी दुपारी तीनपर्यंत ‘त्या’ २५४ मतदारांची यादी तयार झाली नव्हती. ‘आदर्श’च्या निवडणूक निकालाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरणार आहे.
आदर्श शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी ४० वर्षांनंतर प्रथमच मतदान होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. संस्थेतील सदस्य नोंदणीचा वाद न्यायालयात गेला होता. न्यायालयाच्या निकालानंतर ११२ सदस्य ग्राह्य धरून संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. येथील धर्मादाय आयुक्तांकडून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. ११२पकी ५६ मतदार हयात आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच एकूण २५४ मतदारांना मतदानाची संधी मिळावी, यासाठी इतर एक-दोघांनी मतदारयादीवरून न्यायालयात पुन्हा धाव घेतली. त्यावर न्यायालयाने मतदान प्रक्रिया न थांबविता ११२ व २५४जणांना मतदान करू देण्याबाबत निर्णय दिला, मात्र यासाठी त्या २५४ मतदारांची वेगळी मतपेटी ठेवून मतदान घ्यावे व झालेल्या एकूण मतदानाची मोजणी न्यायालयाच्या निकालानंतर घेण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आदर्शच्या निवडणुकीचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार आहेत. न्यायालयाच्या तत्पूर्वीच्या यादीतील नावाच्या निकालात ११२ सदस्य ग्राह्य धरले होते. यात ६१जणांची मतदारयादी प्रसिद्ध झाली. केवळ ५४ मतदार हयात आहेत.
विशेष म्हणजे न्यायालयाने २५४जणांना मतदानाची संधी दिली असताना या निवडणूक प्रक्रियेत मात्र त्या २५४ मतदारांची यादी अजून प्रसिद्ध झाली नसल्याने यात मतदार कोण? हा संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा ऐकावयास मिळते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व कोषाध्यक्ष या ५ पदांसाठी १९, तर कार्यकारिणीच्या १६ सदस्यांसाठी २७जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेनंतर २८ ऑक्टोबरला अर्जाची छाननी झाली व आता ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
निवडणुकीत कमलकिशोर काबरा व ब्रीजलाल खुराणा असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. अध्यक्षपदासाठी काबरा विरुद्ध खुराणा, उपाध्यक्षपदासाठी अॅड. माधवराव नाईक विरुद्ध मुरलीधर बगडिया, सचिवपदासाठी रमेशचंद्र बगडिया विरुद्ध प्रकाश वसेकर, सहसचिवपदासाठी ज्ञानेश्वर गोठरे विरुद्ध स्वरूपचंद परतवार, कोषाध्यक्षपदासाठी मधुकरराव दोडल विरुद्ध स्वरूपचंद परतवार याप्रमाणे उमेदवार मदानात आहेत. कमलकिशोर काबरा यांच्याकडून ५ पदाधिकारी व १६ सदस्यांसाठी एकूण २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. खुराणा गटात ६ उमेदवारांनी १० जागांवर अर्ज दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा