‘शुक्राची चांदणी’ या बहुरंगी लावण्यांच्या कार्यक्रमाचे दोन हजाराहून अधिक प्रयोग केलेल्या दापोडीतील महाविद्यालयीन तरुणी सुवर्णा काळे हिला रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. सामान्य कुटुंबातील या तरुणीला मराठीतील आघाडीचे कलाकार अशोक सराफ व मकरंद अनासपुरे यांच्या समवेत तिला महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली असून तिचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
दापोडीच्या महात्मा फुलेनगर परिसरात राहणाऱ्या सुवर्णाला ‘या टोपीखाली दडलंय काय’ या चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली आहे. शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वी गुरुवारी याबाबत तिने िपपरीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नगरसेविका रमा ओव्हाळ, माजी नगरसेवक सनी ओव्हाळ, सचिन काळे आदी उपस्थित होते.
 शुक्रवारी दापोडी परिसरातून नागरिकांनी सुवर्णाची मिरवणूक काढून तिला अरुण चित्रपटगृहापर्यंत नेण्यात आले. तुडूंब भरलेल्या चित्रपटगृहात आपल्याच परिसरातील नागरिकांसमवेत तिने चित्रपट पाहिला. सुवर्णाचे प्राथमिक शिक्षण दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात ‘जीपीपी’ येथे झाले. शिक्षण करतानाच ‘शुक्राची चांदणी’ मध्ये काम सुरू केले, त्यासाठी महाराष्ट्रभ्रमण करावे लागले. चित्रपटात येण्याचे माझे स्वप्न होते. घरच्या पािठब्यामुळे ते पूर्ण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा