स्वामी विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून लातुरात लोकसहभागातून उभारलेल्या विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण उद्या (रविवारी) होणार आहे. विवेकानंद चौकात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.
अहमदपूरचे शिविलग शिवाचार्य महाराज, फरिदाबादचे (दिल्ली) आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुतळय़ाचे अनावरण होणार आहे. डॉ. अशोक कुकडे, प्रा. नरेंद्र पाठक व महापौर स्मिता खानापुरे यांची या वेळी उपस्थिती असेल. आमदार अमित देशमुख अध्यक्ष आहेत. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रानंतर देशात लातूर येथे लोकसहभागातून विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. सकाळी टाऊन हॉल मदानावरून शालेय विद्यार्थ्यांची विवेकानंद चौकापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. झांजपथक, लेझीमपथक यांचा सहभाग यात असेल. पुतळय़ाच्या अनावरणास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार वैजनाथ िशदे, अॅड. संजय पांडे, डॉ. राजेश पाटील, डॉ. सिद्राम सलगर यांनी केले आहे.

Story img Loader