शहरात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीदिनी १२ जानेवारीला होणार आहे. महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार वैजनाथ िशदे व कार्याध्यक्ष अॅड. संजय पांडे यांनी ही माहिती दिली.
विवेकानंद संस्कार संस्थेच्या पुढाकारातून व लोकसहभागातून नांदेड रस्त्यावर हा पुतळा उभारला आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, फरिदाबाद (दिल्ली) येथील आर्ष योग संस्थानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देवव्रत आचार्य, अहमदपूर येथील वीरमठ संस्थानचे डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, रा. स्व. संघाचे क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोकराव कुकडे, महापौर स्मिता खानापुरे, अभाविपचे प्रांताध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक आदींच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.
साडेनऊ फूट उंच, साडेआठशे किलो वजनाचा हा ब्राँझचा पुतळा नाशिकचे शिल्पकर्मी श्रेयस गग्रे यांनी तयार केला आहे. चौक व चबुतऱ्याचे डिझाईन अभिजीत देशपांडे, तर बांधकाम जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे. डॉ. राजेश पाटील, डॉ. सिद्राम सलगर या वेळी उपस्थित होते.

Story img Loader