‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले स्वप्नील जोशी आणि मुक्ता जोशी या आघाडीच्या कलाकारांना बांधकाम व्यवसायातील ‘सुयोग ग्रुप’ ने ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर म्हणून करारबद्ध केले आहे. ‘सुयोग निसर्ग’ या गृहप्रकल्पानंतर आता वाघोली येथील ‘सुयोग निसर्ग फेज २’ चा शुभारंभ २० ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती भरतभाई शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वप्नील जोशी म्हणाला, ‘‘सुयोग ग्रुप आपुलकीने घरे निर्माण करतात.’’ मुक्ता बर्वे म्हणाली, ‘‘या संस्थेतर्फे कुटुंबाचा विचार करून घरे बनविली जातात.’’   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा