सादर होणाऱ्या कलाकारांच्या भावमुद्रा टिपण्याचे काम सतीश पाकणीकर करीत आहेत. या महोत्सवाची साठ वर्षे आणि छायाचित्रणकलेची तीस वर्षे असा दुहेरी योग साधून त्यांनी यंदाच्या दिनदर्शिकेसाठी ‘स्वरनक्षत्रं’ हा विषय निवडला आहे. गंगूबाई हनगल, पं. फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, विदुषी गिरिजा देवी, पं. जसराज, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. संगमेश्वर गुरव, डॉ. प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर आणि बेगम परवीन सुलताना यांच्या प्रकाशचित्रांनी या दिनदर्शिकेची पाने सजली आहेत. या प्रकाशचित्रांसोबतच त्या त्या कलाकारांनी या महोत्सवात सादर केलेल्या रागांची बंदिश आणि त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती प्रत्येक पानावर वाचण्यास मिळणार आहे. ‘अनुनाद’ या संस्थेने केलेली सुबक मांडणी, आर्ट पेपरवर केलेली उत्तम छपाई आणि वायर-ओ-वायरची बांधणी ही वैशिष्टय़े आहेत.
या दिनदर्शिकेबरोबरच हीरकमहोत्सवी महोत्सवाची आठवण म्हणून वेगळ्या पद्धतीचे ‘सोवेनिअर’ सतीश पाकणीकर यांनी बनविले आहे. नऊ इंच बाय तीन फूट या आकारात महोत्सवामध्ये कला सादर केलेल्या साठ कलावंतांची प्रकाशचित्रे असे या सोवेनिअरचे स्वरुप आहे. ही दिनदर्शिका आणि सोवेनिअर या दोन्हीचेही प्रकाशन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी होणार असून न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या प्रांगणातील स्टॉलवर त्याची सवलतीच्या दरामध्ये विक्रीही होणार आहे.     

Story img Loader