प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात महत्त्वाचे बंदर अशी ओळख असणाऱ्या कल्याण शहराचा अर्वाचीन इतिहासही तितकाच महत्त्वाचा असून सार्वजनिक गणेशोत्सव, गायन समाज, सहकार मंदिर, सार्वजनिक वाचनालय, नमस्कार मंडळ, रिक्रीएशन व्यायामशाळा आदी संस्थांनी ही परंपरा अधिक समृद्ध केली आहे. कल्याणचे ऐतिहासिकत्व अधोरेखित करणाऱ्या संस्थांच्या पंक्तीत आता अनंत हलवाई हे मिठाईचे दुकानही जाऊन बसले आहे. १९१४ मध्ये शहरात दूधविक्री करणाऱ्या गवळी कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या दुकानाने यंदा शंभरी गाठली आहे.
१९१४ मध्ये अनंत विठ्ठल गवळी यांनी सुरू केलेल्या ‘अनंत हलवाई’ या मिठाईच्या दुकानाचे आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले आहे. सर्वोत्तम दर्जा, जिभेवर रेंगाळणारी चव आणि उत्कृष्ट सेवेमुळे उत्तरोत्तर कीर्ती वाढलले ‘अनंत हलवाई’ हे आता केवळ एक दुकान राहिले नसून मिठाई उद्योगातील ‘ब्रॅण्ड’ बनले आहे. गवळी कुटुंबीयांची पाचवी पिढी आता हा व्यवसाय सांभाळीत आहे. उत्कृष्ट चवीची परंपरा जपण्याबरोबरच मिठाई उद्योगातील बदलत्या प्रवाहांची नोंदही गवळी कुटुंबीयांनी घेतल्याने अनंत हलवाई सतत काळाबरोबर राहिले आहेत. विविध प्रकारचे पेढे, बर्फी, श्रीखंड, बासुंदी आदी तब्बल १३२ प्रकारचे मिठाईचे पदार्थ अनंत हलवाईमध्ये बनविले जातात. त्यातील हातोली आणि मंगनी का हलवा या पदार्थाना विशेष मागणी असते. शंभर वर्षांचा ग्राहकांचा विश्वास भविष्यातही कायम टिकावा, याची काळजी घेत असल्याची ग्वाही संचालक प्रफुल्ल गवळी, तसेच निनाद आणि लौकिक यांनी दिली.
ऐतिहासिक कल्याणमधील मिठाईनेही गाठली शंभरी..!
प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात महत्त्वाचे बंदर अशी ओळख असणाऱ्या कल्याण शहराचा अर्वाचीन इतिहासही तितकाच महत्त्वाचा असून सार्वजनिक
First published on: 07-01-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweets century in kalyan