विविध स्पध्रेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण

पर्यावरणाच्या प्रबोधन व जनजागृतीच्या कार्यक्रमांसह विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन उपक्रमशिलतेची जोड द्यावी, असे प्रतिपादन सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक प्रकाश लोणकर यांनी केले.
सामाजिक वनीकरण विभागाद्वारे जिल्हा स्तरावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निबंध, चित्रकला, वक्तृत्व, आवळा निबंध व चित्रकला स्पध्रेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
सहाय्यक संचालक संतोष लांडे, वनश्री पुरस्कार विजेते सुरडकर, एन.एन.खाचणे, गजानन जोशी, अनिल वाघ, आनंद दारमोडे, शांताराम जोशी, पी.टी.गव्हाणे, पी.आर.चव्हाण, पी.एस.चंद्रे, डी.बी.भोंबे, संजय दळवी आदींची उपस्थिती होती.
यावेळी विविध स्पध्रेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात माध्यमिक गटात निबंध स्पध्रेत प्राथमिक गटात स्वाती जुमडे प्रथम, राखी किर्तनकार द्वितीय, अंकिता जगताप तृतीय, महाविद्यालयीन गटात निबंध स्पध्रेत लक्ष्मी तलरेजा प्रथम, मयुरी पळसकर द्वितीय, श्रध्दा पाटील तृतीय यांना पारितोषिके देण्यात आली.
प्राथमिक गट चित्रकला स्पध्रेत ऋषीकेश तेल्हारकर, रश्मी तायडे, प्रतीक्षा नारखेड, ऐश्वर्याराणी देशमुख.
माध्यमिक गट चित्रकला स्पध्रेत रेणुका चिंचोळकर, रोहित वाघ, पुजा साखरे, महाविद्यालयीन गट चित्रकला स्पध्रेत राजेश मुंदरे, शीतल पाटील, ममता पाटील.
माध्यमिक तक्तृत्व स्पध्रेत परिमल गवई, अनिकेत गावंडे, विनायक मापारी, शिवानी वानखडे.
महाविद्यालयीन गट वक्तृत्व स्पध्रेत किरण सरोदे, योगश्री लढ्ढा, अंकिता पवार, नयना वाघोदे, जिल्हास्तरीय आवळा निबंध स्पध्रेत प्राथमिक गटात चैताली बाजड, ज्ञानेश्वर पिठकर, योगिता सानप, अरगवा खान, राजश्री कुळकर्णी.
महाविद्यालयीन निबंध स्पध्रेत भक्ती जोशी, पुजा निचोडे, क ोकीळा तळेकर, वैजीनाथ सावंत.
तर  प्राथमिक गट चित्रकला स्पध्रेत कुणाल जाधव, सईमा सईद, ऋषीकेश तेल्हारकर यांना पारितोषिके देण्यात आली.
माध्यमिक गट चित्रकला स्पध्रेत पुजा खंडागळे, स्नेहा बोडखे, वरद सावजी, महाविद्यालयीन गट चित्रकला स्पध्रेत वैशाली पडोळकर, ओमप्रकाश अल्हाट, पूनम घोपे यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.