एप्रिल आणि मे महिना म्हणजे कडक उन्हाचा आणि परीक्षांचा. त्यामुळे धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
उन्हाळ्यात प्रामुख्याने डोळ्यांना होणारे त्रास- अतिनील किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱ्या इजेस फोटोकेराटिटिस असे म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे या समस्या प्रामुख्याने जाणवतात. डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार करून घेणे आवश्यक आहे. नेत्रपटलास यूव्ही लाईटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो. म्हणून यूव्ही लाईट्समुळे पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकतो. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली तर उन्हाळ्यातील डोळ्यांचे आजार सहज टाळता येऊ शकतात, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. मदान यांनी सांगितले.
उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल, स्कार्प वापरणे. यूव्ही-ए व यूव्ही-बी या दोन्हीही किरणांपासून ९९-१००% टक्के संरक्षण करणारे सनग्लास वापरणे योग्य ठरते. डोळे पूर्ण कव्हर करणारे व डोळ्यांजवळ व्यवस्थित बसणारे सनग्लास वापरावेत तो सनग्लास बी २ इतका काळा असणे गरजेचे आहे.
औषधांबरोबरच सतत डोळे थंड पाण्याने धुणे, डोळ्यांवरती थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवणे, डोळे चोळू नयेत यासारख्या गोष्टी कराव्यात. डोळे थंड पाण्याने धुताना डोळे उघडे ठेवून धुवू नयेत. डोळे उघडे ठेवल्यामुळे डोळ्यातील नैसर्गिक अश्रू धुतले जातात. अश्रू व पाण्याचा पीएच वेगळा असल्यामुळे डोळे चुरचुरू लागतात. हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रूंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडू लागतात. डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, पाणी येणे असे त्रास होऊ लागतात. म्हणून डोळे सतत थंड पाण्याने धुणे, कोल्ड कॉम्प्रेस, अर्टीफ्युअल टीअर्स ड्रॉप वापरणे योग्य ठरेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अतिनील किरणांमुळे मोतिबिंदूची समस्याही उद्भवू शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर, दूध तसेच ताज्या फळांचा रस यांचा समावेश केला तर डोळे निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले.
उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्याचा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला
एप्रिल आणि मे महिना म्हणजे कडक उन्हाचा आणि परीक्षांचा. त्यामुळे धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
First published on: 17-04-2014 at 09:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care of eyes in summer