मार्च, एप्रिल आणि मे हे महिने कडक उन्हाचे आणि परीक्षांचे. धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. 

वसंत ऋतूमध्ये झाडांची पानगळ सुरू होते. हळूहळू उन्हाचा कडाका आणि मग डोळ्यांच्या तक्रारींनाही सुरुवात होते. उन्हाळ्यात प्रामुख्याने डोळ्यांना होणारे त्रास- अतिनील किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱ्या इजेस फोटोकेराटिटिस असे म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे या समस्या प्रामुख्याने जाणवतात. डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार करून घेणे आवश्यक आहे. नेत्रपटलास यूव्ही लाईटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो. म्हणून यूव्ही लाईट्समुळे पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकतो. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली तर उन्हाळ्यातील डोळ्यांचे आजार सहज टाळता येऊ शकतात, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. मदान यांनी सांगितले.
उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल, स्कार्प वापरणे, यूव्ही-ए व यूव्ही-बी या दोन्हीही किरणांपासून शंभर टक्के संरक्षण करणारे सनग्लास वापरणे योग्य ठरते. डोळ्यांजवळ व्यवस्थित बसणारे सनग्लास वापरावेत. तो सनग्लास बी २ इतका काळा असणे गरजेचे आहे. यूव्ही-रॉयजपासून संरक्षण करणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्ससुद्धा उपलब्ध आहेत. सनग्लास व कॉन्टॅक्ट लेन्स दोन्ही एकदम वापरणे योग्य ठरते.
वसंत ऋतूमध्ये झाडांची होणारी पानगळ, हवेत पसरणारे परागकण, हवेतील धूळ यामुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जी होते. विशेषत: चार ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना जास्त अ‍ॅलर्जी होते. यामध्ये डोळ्यांना खूप खाज येते. डोळे लाल होतात. डोळ्यातून पाणी येते. तसेच डोळ्यातून पांढरा दोरीसारखा व्हाईट रापी डिस्चार्ज येणे या तक्रारी जाणवतात. विशेष म्हणजे अ‍ॅलर्जी वसंत ऋतूमध्ये होत राहते म्हणून यास स्प्रिंग कॉन्टॅक्ट असे म्हणतात. तेत्रतज्ज्ञांना दाखवून पुढील औषधे सुरू करणे अपेक्षित असल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले.
स्टेरिऑड (माइल्ड) आय ड्रॉप जास्त अ‍ॅलर्जी असल्यास, अ‍ॅलर्जी प्रतिबंधक (अ‍ॅन्टी-अ‍ॅलेर्जिक) व अ‍ॅन्टी-हिस्टामिनिक आय ड्रॉप आर्टीफिशियल (कृत्रिम)अर्टीफ्युल टीअर्स. या औषधांबरोबरच सतत डोळे थंड पाण्याने धुणे, डोळ्यांवरती थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवणे, डोळे चोळू नयेत यासारख्या गोष्टी कराव्यात. डोळे थंड पाण्याने धुताना डोळे उघडे ठेवून धुवू नयेत. डोळे उघडे ठेवल्यामुळे डोळ्यातील नैसर्गिक अश्रू धुतले जातात. अश्रू व पाण्याचा पीएच वेगळा असल्यामुळे डोळे चुरचुरू लागतात. हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रूंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडू लागतात. डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, पाणी येणे असे त्रास होऊ लागतात. म्हणून डोळे सतत थंड पाण्याने धुणे, कोल्ड कॉम्प्रेस, अर्टीफ्युअल टीअर्स ड्रॉप वापरणे योग्य ठरेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अतिनील किरणांमुळे मोतिबिंदू म्हणजे डोळ्यावर पांढरा पडदा येणे, अशा समस्याही उद्भवू शकतात. या सर्व उपायांबरोबर आहारात हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर, दूध तसेच ताज्या फळांचा रस यांचा समावेश केला तर डोळे निरोगी राहण्यासमोठी मदत होते.
लहान मुलांना उन्हाळ्यात काजळ लावू नये. महिलांनी चेहऱ्यावर कॉस्मेटिक वापरताना ते ते डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी. सध्या शहरात विविध भागातील फूटपाथवर गॉगल्सची विक्री केली जाते. मात्र, हे गॉगल्सचे काच हे डोळ्याला घातक आहेत. त्यामुळे गॉगल स्वस्त मिळत असेल तरी त्यापासून सावध राहावे, असे आवाहन डॉ. मदान यांनी केले आहे.

Story img Loader