राष्ट्राची अस्मिता म्हणजे तिरंगा. प्लॅस्टिक आणि कागदाचे ध्वज लहान मुलांच्या हातात दिले जातात. स्वातंत्र्यदिनानंतर ते रस्त्यावर विखरून पडतात. त्यामुळे ध्वजाचा अपमान होतो. ही विटंबना थांबविण्यासाठी विविध संघटनांनी आता पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. हिंदू जनजागृतीच्या वतीने जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार आहे. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या वतीने कचरा वेचकांमार्फत विशेष अभियान सुरू करण्यात येणार आहे. १६ व १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्ल२स्टिक व कागदापासून बनविलेले ध्वज उचलले जाणार आहेत. या कामात सामाजिक संस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लॅस्टिक व कागदापासून बनविलेला तिरंगा न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केलेली आहे. तसेच राज्यपालांकडूनही ध्वजसंहितेच्या पालनाविषयीचे निर्देश २२ ऑगस्ट २००७ रोजी देण्यात आले होते त्याचे पालन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखण्याच्या अनुषंगाने ध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर होऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. शाळांमध्येही या अनुषंगाने प्रबोधन करण्यात येणार असून शहरात हे काम करणाऱ्या नागरिकांचे राष्ट्रप्रेमी नागरिक कृती दल स्थापन करण्यात आले आहे. प्लॅस्टिकच्या कागदापासून बनविलेला तिरंगा एखादा फेरीवाला विक्री करीत असेल तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असे हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक अशोक कुलकर्णी यांना सांगितले.
कचरा वेचक व कष्टकरी सभेकडूनही ध्वज उचलण्यात येणार असून, शहरातील गांधी भवन समर्थनगर येथे या कामात सहकार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी १६ व १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता यावे, असे आवाहन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या सल्लागार डॉ. विनया भागवत यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा