कोकणगाव (ता. संगमनेर) येथील कामगार तलाठी राजेंद्र मारुती लोखंडे याला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जमीन खरेदीची सरकारी दप्तरात नोंद करण्यासाठी म्हणून त्याने तक्रारदार नामू तुकाराम वायकर (राहणार कोकणगाव) यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.
वायकर यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या नगर विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी तसेच अरूण बांगर, शैलेंद्र जावळे, राजेंद्र खोंडे, वसंत वाव्हळ, संजय तिजोरे, रविंद्र पांडे, प्रमोद जरे, श्रीपादसिंग ठाकूर, राजेंद्र सावंत, दशरथ साळवे यांनी सापळा लावला. त्यात लोखंडे रंगेहाथ सापडला.