मराठी, बंगाली किंवा भोजपुरी अशा प्रादेशिक चित्रपटांना मुख्य प्रवाहातील हिंदी सिनेमाशी मोठी स्पर्धा करावी लागते. परंतु, तरीसुद्धा अलीकडच्या काळात मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची वाहवा होतेय. या पाश्र्वभूमीवर ‘स्क्रीन’ साप्ताहिकाने प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात झालेले सकारात्मक बदल, एकूण वातावरण याविषयी ‘स्क्रीन बिग पिक्चर’च्या माध्यमातून सकस चर्चा घडवून आणली. यामध्ये ‘स्क्रीन’ साप्ताहिकाच्या संपादिका प्रियांका सिन्हा झा, अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह अन्य प्रादेशिक चित्रपटांतील कलावंत रवी किशन, काजल अग्रवाल आणि ऋतुपर्णा सेनगुप्ता सहभागी झाले होते.
मराठी तसेच भोजपुरी, बंगाली, तेलुगू, तामिळ, मल्याळम इत्यादी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, त्याची कथानके, त्यातील कलावंत आता गाजत आहेत. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार मराठी चित्रपटाने, कलावंतांनी मिळविले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपला ठसा उमटविला.
अगदी बॉलीवूडमध्येही मराठी चित्रपटाबाबत औत्सुक्याचे वातावरण दिसून येतेय. म्हणूनच या संदर्भातील चर्चेत सुरुवातीलाच हिंदी सिनेमाचा प्रभाव प्रादेशिक चित्रपटावर किती पडतो, यावर मतमतांतरे व्यक्त झाली. सचिन खेडेकर म्हणाला की, सध्या हिंदी सिनेमात दाक्षिणात्य भाषांमधील चित्रपटांचे मोठय़ा प्रमाणावर रिमेक केले जात आहेत. परंतु, मराठी सिनेमाचा हिंदीत किंवा हिंदी सिनेमाचा मराठीत रिमेक केले जात नाहीत. ‘अस्तित्व’सारखा सिनेमा द्वैभाषिक बनविला गेला होता. मराठी सिनेमात कथावस्तुलाच प्राधान्य दिले जाते. त्यावरच मराठी सिनेमाचा डोलारा उभा आहे. मराठीत स्टार कलावंत नाहीत. विषयवैविध्य आणि सकस पटकथा हाच मराठी सिनेमाचा जीव आहे,
हिंदी सिनेमाबाबत परखडपणे बोलताना सचिन खेडेकर म्हणाला की, हिंदी सिनेमा बदलतोय असे अजिबात दिसत नाही. नायक अभिनेते, स्टार कलावंत फक्त बदलतात. काही अपवाद वगळता फॉम्र्युला बदलत नाही. हिंदीमध्ये कदाचित मूळ कथानक लिहिण्याची वानवा असावी. जुन्या लेखकांबद्दल हे मत व्यक्त करता येत नाही, तर नवीन लेखक हिंदीत आले असले तरी पटकथेत नावीन्य दिसत नाही. म्हणूनच रिमेक हिंदीमध्ये बनतात. वास्तविक मराठी, गुजराती, भोजपुरी सिनेमाचा प्रेक्षक हा हिंदी सिनेमाचाही प्रेक्षक आहे. फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांना हिंदी येत नसल्यामुळे तिथे हिंदीशी स्पर्धा नसते. परंतु, मराठी सिनेमाचा ८० टक्के प्रेक्षक हिंदी सिनेमा पाहतोच. म्हणून मराठी व गुजराती, भोजपुरी सिनेमाला हिंदी सिनेमाशीच मोठी स्पर्धा करावी लागतेच, असे खेडेकरने मत मांडले.
प्रादेशिक सिनेमातील कलावंत अधिक गुणवंत आणि सशक्त अभिनय करतात. हिंदीतील कलावंतही मराठीमध्ये किंवा प्रादेशिक सिनेमात काम करताना दिसतात. या बदलाविषयी बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की, प्रादेशिक चित्रपटांतील अनेक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा