पाणीपुरवठय़ास लागणाऱ्या टँकरच्या मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत. सोयगाव तालुक्यातील ८ गावे ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारीच्या आत असल्याने दुष्काळग्रस्त जाहीर करावीत, फळबाग शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांच्याकडे केली.
टंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नये, असा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. त्याच्या सूचना निर्गमित कराव्यात. ग्रामपंचायत स्तरावर तलाठय़ांना टंचाईच्या कामी सतर्क राहण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती खैरे यांनी केली. पावसाच्या अवकृपेमुळे चारा शिल्लक नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालविता येईल, असे प्रश्न भेडसावत आहे. त्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास समस्या जटिल होतील. त्यामुळे कर्जाच्या थकबाकी वसुलीस स्थगिती देऊन आवश्यक वाटल्यास बँकांनी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. कामगारांना तातडीने काम उपलब्ध करून द्यावे. पिण्याचे पाणी आणि चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा