साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरने द्यावे लागणार पाणी
येत्या उन्हाळय़ात जिल्हय़ातील जवळपास साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली. टँकरचे पाणी साठविण्यास १ हजार ६४४ सिन्टेक्स टाक्यांची गरज पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, जालना शहरातील उद्योजकांनी ५ हजार लीटर क्षमतेच्या ९७० सिन्टेक्सच्या टाक्या मदत म्हणून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी श्याम देशपांडे व आमदार कैलास गोरंटय़ाल यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेच्या वेळी उद्योजकांनी मदतीचा हात पुढे केला. जिल्हय़ात ९७० गावे असून तेवढय़ाच टाक्या मदत म्हणून देण्याचे आश्वासन उद्योजकांच्या वतीने किशोर अग्रवाल यांनी या वेळी दिले. डॉ. सुभाष अजमेरा, डी. बी. सोनी, अरुण अग्रवाल यांच्यासह अनेक उद्योजक या वेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार जालना तालुक्यातील सर्वाधिक १२२ गावे-वाडय़ांना ३६६ सिन्टेक्स टाक्या लागणार आहेत. अन्य तालुक्यांत लागणाऱ्या सिन्टेक्सच्या टाक्यांची संख्या पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे जूनपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असलेल्या गावे-वाडय़ांची आहेत. बदनापूर २७६ (९२), अंबड २६१ (८७), घनसावंगी १९५ (६५), परतूर ६९ (२३), मंठा ५१ (१७), भोकरदन २७६ (९२) व जाफराबाद १५० (५०).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा