मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाबाहेरील एका प्रीपेड टॅक्सी चालकाने डोंबिवलीतील एका महिलेची टॅक्सीत विसरलेली ७५ हजारांचा ऐवज असलेली पिशवी परत केली आहे. महिलेला पैशाची पिशवी परत करत असताना त्याला बक्षीस म्हणून दिलेले पैसे स्वीकारण्यास चालकाच्या मुलाने नम्रपणे नकार दिला. प्रामाणिकपणामुळे आम्हाला देव मनापासून मदत करीत असतो असे त्याने प्रवाशाला सांगितले.
श्रीनगरला गेलेले मुरलीधर व मीना गोडखिंडी हे कुटुंब सांताक्रूझ विमानतळावर दोन दिवसांपूर्वी मुंबईत संध्याकाळी उतरले. विमानतळाबाहेर जितेंद्र प्रताप दुबे या प्रीपेड टॅक्सी चालकाच्या सहाय्याने गोडखिंडी कुटुंब डोंबिवलीत रात्री साडेआठ वाजता आले. टॅक्सीतून सर्व सामान उतरून घेतले. टॅक्सी मुंबईच्या दिशेने निघून गेली. घराच्या दरवाजात गेल्यावर गोडखिंडी यांना आपली पर्स टॅक्सीत राहिल्याचे लक्षात आले. रोख रकमेसह ७५ हजारांचा ऐवज पर्समध्ये होता. मुरलीधर गोडखिंडी यांनी तात्काळ रेल्वेने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. टॅक्सीची नोंदणी करताना टॅक्सी चालकाला गोडखिंडी कुटुंबाने घराचा दूरध्वनी क्रमांक दिला होता. वाटेमध्ये चालक जितेंद्र दुबे यांना प्रवासी पिशवी विसरल्याचे लक्षात आले. त्याने गोडखिंडींच्या घरच्या दूरध्वनीवर तात्काळ दूरध्वनी केले. ‘पिशवी माझ्याकडे आहे. सकाळी येऊन घेऊन जा’ असे चालकाला सांगायचे होते. घर उघडणे शक्य नसल्याने चालकाशी संपर्क झाला नाही. रात्री बारा वाजता मुरलीधर गोडखिंडी विमानतळ टॅक्सी वाहनतळावर पोहोचले. टॅक्सी चालक दुबे यांनी तात्काळ आपल्या मुलाला गोडखिंडी यांची पिशवी घेऊन वाकोला पोलीस ठाणे येथे पाठवले. तेथे मुलाने गोडखिंडी यांना पिशवी परत केली. एक सौजन्य म्हणून चालकाच्या मुलाला गोडखिंडी यांनी बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. त्याने ते नाकारले. प्रामाणिकपणातून भरपूर काही मिळत असते असे उद्गार त्याने काढले.
टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा
मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाबाहेरील एका प्रीपेड टॅक्सी चालकाने डोंबिवलीतील एका महिलेची टॅक्सीत विसरलेली ७५ हजारांचा ऐवज असलेली पिशवी परत केली आहे.
First published on: 09-05-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxi driver returns cash of traveller