मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील ९ मुलींवर शिक्षकांकरवी विनयभंगाच्या, तर पाचगाव येथील मुलीवर अतिप्रसंगाच्या प्रकरणात मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दयाळनाथ माळवे, तर बेलाटी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक एस.एल. साठवणे व सहायक शिक्षक भगिंद्र के. बोरकर यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी ३७ (१)(३) कलम लागू केले आहे.
मोहाडी जिल्हा परिषद हायस्कूलच्या ९ मुलींचा विनयभंग करणाऱ्या राजू बागडे या शिक्षकाला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. विनयभंगाची तक्रार मुख्याध्यापक माळवे यांना ५ दिवसांपूर्वीच मुलींनी दिली होती, तरीही त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही म्हणून माळवे यांना निलंबित करण्यात आले, तर बेलाटी जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी यादोराव बोरकर याला निलंबित करण्यात आले. हे प्रकरण दडपण्यासाठी मुख्याध्यापक साठवणे व सहायक शिक्षक भगिंद्र बोरकर यांनी मुलगी या शिक्षकासोबत शाळेबाहेर असतानाही तिची हजेरीपटावर उपस्थिती लावली म्हणून शिक्षण विभागाने या दोघांनीही निलंबित केले. दरम्यान, भंडारा जिल्ह्य़ात मोर्चे, धरणे, आंदोलने शांततेत पार पडावीत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व शांतता अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी ३७(१)(३) कलम लागू केले आहे.
या आदेशाचा अंमल ७ मार्च २०१३ च्या मध्यरात्रीपर्यंत राहील. यात काळात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठय़ा, काठय़ा किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे, तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, जाहीरपणे गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींमुळे सभ्यता वा नीतीमत्तेस धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग करणे, चिन्ह, फलके किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा जनतेत त्यांचा प्रसार करणाऱ्यांना हे आदेश लागू राहतील. तथापि, अंत्ययात्रा धार्मिक कार्यक्रम, यात्रांतर्गत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस हे आदेश लागू होणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा