सासरच्या छळास कंटाळून एका शिक्षिकेने आत्महत्या केल्याची घटना कासारवाडी येथील मंगलभवन इमारत येथे घडली. याप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा गणेश यादव (वय २५, रा. मंगलभवन इमारत, कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी नंदाचा पती गणेश दादू यादव व बाबूराव दादू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०१२ मध्ये नंदा व गणेश यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर पती व दीर यांनी नंदा यांना माहेरुन फ्रीज, वॉशिंग मशिन व रोख दीड लाख रुपये घेऊन यावेत म्हणून छळ सुरु केला. तिला मारहाण केली. या छळास कंटाळून ११ नोव्हेंबर रोजी नंदा यांनी घरातील अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन कडाळे हे अधिक तपास करत आहेत.
सासरच्या छळास कंटाळून शिक्षिकेची आत्महत्या
सासरच्या छळास कंटाळून एका शिक्षिकेने आत्महत्या केल्याची घटना कासारवाडी येथील मंगलभवन इमारत येथे घडली. याप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा गणेश यादव (वय २५, रा. मंगलभवन इमारत, कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
First published on: 21-11-2012 at 04:29 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher suside herself for pressure from family