या जिल्ह्य़ात प्राथमिक शिक्षकांना पदवीधर पदस्थापना देताना त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येत नाही, परंतु यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्य़ांतील शिक्षकांना ती देण्यात येते, अशी माहिती संदीप तिळके यांच्या नेतृत्वातील शिक्षकांनी शिक्षक समितीचे सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, किशोर डोंगरवार, एम.एच. दीक्षित यांच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भात जिल्हा शिक्षक समितीने यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्य़ांतील पदवीधर शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतननिश्चितीची सेवा पुस्तिकेतील साक्षांकित प्रत मागवून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांशी, तसेच लेखा वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांच्या कक्षात चर्चा केली. चच्रेत संबंधितांनी या विषयावर दिवाळीनंतर विभागातील कर्मचाऱ्यांना घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. संदीप तिडके यांच्या नेतृत्वातील शिक्षकांनी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्याशी चर्चा घडवून आणून अग्रवाल यांनी हा प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल, असे सांगितले. या शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, कार्याध्यक्ष शेषराव येळेकर, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, संचालक सुरेश रहांगडाले, संदीप तिडके, संदीप खेडीकर, अरुण सावरकर, विजय मरस्कोल्हे उपस्थित होते.
‘जीआर’प्रमाणे वेतनवाढ देण्याची शिक्षकांची मागणी
पदवीधर शिक्षकांच्या वेतननिश्चिती संदर्भात इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्य़ातील पदवीधर शिक्षकांना एक वेतनवाढ कमी देण्यात येत आहे. शासनाच्या जीआरप्रमाणे व इतर जिल्ह्य़ांप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी, या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळ शिक्षणाधिकारी एस.एस. संग्रामे यांना भेटून मागणी केली.
First published on: 16-11-2012 at 05:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers salary increses should be as on gr