उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रवाह व तंत्रज्ञानाची भर पडत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अ‍ॅकेडमिक स्टाफ कॉलेजमध्ये आयोजित व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. माने बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुकर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालक डॉ. महेंद्र सिरसाट अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहसंचालक डॉ. मोहम्मद अब्दुल रफे, कोर्स समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
डॉ. माने यावेळी म्हणाले, विद्यापीठ व महाविद्यालयाच्या विकासात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सकारात्मक भूमिका ही संस्थेच्या नावलौकिक वाढविण्यात महत्त्वाची ठरते.
विद्याप्रबोधिनी ही खऱ्या अर्थाने शिक्षक, कर्मचारी यांच्यातील संवेदनशील माणूस घडविणारी कार्यशाळा आहे, असे मत प्राचार्य मधुकर गायकवाड यांनी व्यक्त केले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते अधिकारी या प्रत्येकाच्या अडचणी सोडवणारा कुशल प्रशासक असतो. या कार्यशाळेतून कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल दृष्टिकोण बदलला आहे, असेही प्राचार्य गायकवाड म्हणाले. शिक्षकेतर कर्मचारी याऐवजी प्रशासकीय कर्मचारी असे म्हटले जावे, असे मत अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. महेंद्र सिरसाट यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत राज्यभरातून ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा