संगीत, कला व काव्याची जोड दिल्यास कलेच्या माध्यमातून विज्ञान समाजमनात चांगल्या रीतीने रुजू शकते. ओवीरूपाने लिहिलेल्या ग्रंथाच्या माध्यमातून विज्ञान विषय विद्यार्थ्यांच्या मनात अधिक प्रभावी रुजू शकतो, असे प्रतिपादन स्वारातीमविचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
सरस्वती संगीत कला महाविद्यालयात आयोजित संगीतरजनी कार्यक्रमात डॉ. विद्यासागर बोलत होते. पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, प्राचार्य डॉ. राम बोरगावकर, गोिवदराव बोरगावकर, बाबुराव बोरगावकर यांची उपस्थिती होती. लातूरसारख्या भागात संगीतकला रुजवण्यास बोरगावकर घराण्याने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार डॉ. विद्यासागर यांनी काढले. गायकर यांनी साहित्य, संगीत व कलेची जोपासना केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसून समाज सुसंस्कृत होण्यास मदत होते, असे सांगितले. बोरगावकर यांनी समाजात संगीतकला वृद्धिंगत व्हावी, यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे नमूद केले. अभय करंदीकर व प्रा. विश्वनाथ स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. सच्चिदानंद देशपांडे, प्रा. बालाजी िशदे, शशिकांत सोळंके, अमरीश शीलवंत, विठ्ठल चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.