आज जग यंत्रशरण झाले आहे. यंत्राच्या युगात विद्यार्थ्यांचे भावविश्व मुख्याध्यापकाला ओळखता आले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातला तो जागल्या असून विद्यार्थ्यांसाठी दीपगृह आहे. मुख्याध्यापकाला या भूमिका पार पाडण्यास सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन ५२व्या मुख्याध्यापक शैक्षणिक संमेलनाचे अध्यक्ष भास्करराव आर्वीकर यांनी केले. मराठवाडा कृषी विद्यापीठात सोमवारी ५२व्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक शैक्षणिक संमेलनास प्रारंभ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. संमेलनाध्यक्ष भास्करराव आर्वीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर विविध व्यक्त्यांचे शोधनिबंध, परिसंवाद घेण्यात आले. मुख्याध्यापकाला शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज, संस्थाचालक, शासन यांची मोट बांधावी लागते. वरील सर्व घटकांत सुसंगत संवाद अपेक्षित असतो. परंतु सध्या या घटकांना बांधून ठेवणारी आस्था कमी पडत आहे असे दिसते. शिक्षणक्षेत्रात त्याची उणीव जाणवत आहे. ही गंभीर बाब असल्याचे आर्वीकर म्हणाले. संमेलन यशस्वी करण्यासाठी विभागीय उपाध्यक्ष गोविंद मुंढे, जिल्हाध्यक्ष डी. एल. उमाटे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे आदी प्रयत्नशील आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा