पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या महसुलीबाबींच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने पनवेल तहसील कार्यालयाने बुधवार व गुरुवार असे दोन दिवसीय विशेष अभियान सामान्यांसाठी हाती घेतले आहे. या अभियानाला महसुली दरबार असे नाव देण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या दरबारात सर्व तलाठी एकाच वेळी शेतकऱ्यांना एका छताखाली मिळणार आहेत.
१ ऑगस्टला असणाऱ्या महसूल दिनानिमित्त हा उपक्रम राबवीत असल्याचे तहसीलदार पवन चांडक यांनी सांगितले. या दोन दिवसांच्या अभियानात विविध दाखल्यांमध्ये उत्पन्न, डोमिसाईल, रहिवास, जेष्ठ नागरिक ओळखपत्र तसेच शेतकरी दाखला (सुधारित), रेशनकार्डावरील नाव कमी व वाढविणे किंवा पत्ता बदली करणे, अंत्योदय कार्डाचे वाटप करणे, सातबाराचे फेरफार उतारे, सातबारा संबंधित प्रकरणे, वारस नोंदी, खरेदीखत नोंदी, फेरफार मंजुरी, शासकीय वसुली भरणा, जमिनीची महसुली मागणी निश्चित करणे, कुळ कायदा कलम ४३ खालील परवानगी, सातबाराचे पुनर्लेखन व प्रख्यापन अशी कामे करण्यात येतील. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा दरबार सामान्यांसाठी खुला असणार आहे.
शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयाची दारे उघडी
पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या महसुलीबाबींच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने पनवेल तहसील कार्यालयाने बुधवार व गुरुवार असे दोन दिवसीय विशेष अभियान
First published on: 31-07-2014 at 09:00 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehsil office open to farmers