शहरासह परिसरात मध्यरात्रीनंतर रोहिणी नक्षत्राचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला असून उकाडय़ाने त्रस्तावलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दुष्काळ व पाणी टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या जामनेर परिसरातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले. धुळे जिल्ह्यात तुरळक सरी बरसल्या.
जून महिन्यास सुरूवात झाली असली तरी जळगावचा पारा काही खाली उतरला नव्हता. जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला तर जळगाव परिसरात मात्र त्याची प्रतीक्षा होती. सोमवारी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. तरीही शहराच्या काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे उकाडय़ाचे प्रमाण अधिकच वाढले. रात्री बारा वाजेनंतर आकाशात ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली.
तत्पुर्वी, दीड ते दोन तास वादळी वारे सुरू होते. अर्धा ते पाऊस तास जोरदार पाऊस सुरू होता. पहिल्याच पावसाने हवेत चांगलाच गारवा जाणवायला लागला असून नागरीक व शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्याच्या जामनेर या दुष्काळ व टंचाईचे सर्वाधिक चटके सोसणाऱ्या तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे परिसरात शेकडो झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही वाकले. त्यामुळे तारा तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा