व्यावसायिक वापरासाठी स्थानकांमध्ये जागाू
सरकते जिने, उन्नत रेल्वेमार्ग अशा नवनव्या योजनांमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वेने आता उपनगरीय प्रवाशांना आणखी एक सुखद धक्का देण्याचे ठरवले आहे. येत्या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दहा स्थानकांचा कायापालट होणार असून त्यांना व्यावसायिक रूपडे मिळणार आहे.
रेल्वे भूविकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण या दोन संस्थांमध्ये मंगळवारी सामंजस्य करार होणार असून त्यात तीन स्थानकांच्या विकासाचा उल्लेख असेल. तर इतर सात स्थानकांच्या विकासात मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण आणि जागतिक बँक यांचा मोलाचा वाटा असेल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोध जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. दादर, ठाणे, बोरिवली, कुर्ला, कल्याण, मुंबई सेंट्रल, अंधेरी, विरार,मुलुंड, भांडूप आणि ठाणे या स्थानकांचा विकास या योजनेतून केला जाणार आहे.
रेल्वे भूविकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण यांनी एकत्र येत प्रायोगिक तत्त्वावर मुलुंड, भांडूप आणि ठाणे या स्थानकांचा व्यावसायिकदृष्टय़ा कायापालट करण्याचे ठरवले आहे. या स्थानकांची पुनर्बाधणी करताना त्यात व्यावसायिकदृष्टय़ाही काही जागा विकसित केली जाणार आहे. तसेच या स्थानकांतील प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग, स्वच्छतागृहे, प्लॅटफॉर्मच्या पृष्ठभागाचे समतोलीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सामंजस्य करारावर मंगळवारी दोन्ही प्राधिकरणे स्वाक्षऱ्या करतील.
याशिवाय अंधेरी, बोरिवली, विरार या पश्चिम रेल्वेवरील तीन आणि कुर्ला, दादर, ठाणे व कल्याण या मध्य रेल्वेवरील चार स्थानकांचाही विकास मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण हाती घेणार आहे. यासाठी प्राधिकरणाला जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या मदतीतून या दहा स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. या स्थानकांवर डेक बांधण्यात येणार असून ती जागा व्यावसायिक वापरासाठी तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास पुढील तीन महिने उलटतील, असे सुबोध जैन यांनी सांगितले.
मुंबईतील दहा रेल्वेस्थानके चकाचक होणार!
व्यावसायिक वापरासाठी स्थानकांमध्ये जागाू सरकते जिने, उन्नत रेल्वेमार्ग अशा नवनव्या योजनांमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वेने आता उपनगरीय प्रवाशांना आणखी एक सुखद धक्का देण्याचे ठरवले आहे. येत्या काळात मध्य आणि पश्चिम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-07-2013 at 08:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten railway stations will be cleaned up in mumbai