आ. विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात रविवारी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
तालुक्यातील पारनेर, सुपे, अळकुटी, कान्हुरपठार, राळेगणसिद्घी, रांजणगाव मशीद, पळवे बुद्रुक, वाडेगव्हाण, निघोज, जवळा, देवीभोयरे, वडझिरे, लोणीमावळा, टाकळीढोकेश्वर, वडगाव सावताळ, कर्जुलेहर्या, पिंपळगाव रोठा, खडकवाडी, वनकुटे, पोखरी, भाळवणी, जामगाव व ढवळपुरी या केंद्रांवर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र विषय देण्यात आला होता. २७ फेब्रुवारी रोजी आ. औटी यांच्या वाढदिवशी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
उद्योजक रामदास भोसले, बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, भारतीय कामगार सेनेचे राष्ट्रीय सहसचिव अनिकेत औटी, पंचायत समितीचे सभापती सुदाम पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके, पारनेरचे सरपंच अण्णासाहेब औटी, प्रदीप वाळुंज यांनी केंद्रांना भेटी देउन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र काही केंद्रांवर या स्पर्धामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला.
 

Story img Loader