नवी दिल्ली येथे अखिल भारतीय टेनिस संघटनेमार्फत आयोजित मुलांच्या सांघिक लॉन टेनिस स्पर्धेकरिता नाशिक जिमखान्याच्या विक्रांत मेहताची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा दिल्ली येथे २७ मे ते १ जून या कालावधीत डेव्हिस चषकाच्या धर्तीवर खेळविण्यात येत आहे. विक्रांत हा नाशिक जिमखान्यात प्रशिक्षक राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. विक्रांत सीडीओ मेरी हायस्कूलचा विद्यार्थी असून या यशाबद्दल नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा