जालना जिल्ह्य़ात जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची गरज आहे. वीज प्रश्नाबाबतही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. जालना जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाच्या पाहणीनंतर ठाकरे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. काही मिनिटांत दुष्काळाची माहिती व त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीच नाहीत. सरकारला सांगू, अहवाल देऊ, असे सांगत त्यांनी पत्रकार बैठक गुंडाळली.
मुंबईला जाणारे विमान गाठायचे असल्याने ठाकरे यांनी जालन्याच्या दौऱ्याची घाईघाईत माहिती दिली. सकाळी नऊपासून जालना जिल्ह्य़ातील दुष्काळी कामांची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेच्या कामाला भेट देऊन टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची पाहणी केल्याचे ते म्हणाले. मार्च-एप्रिल व मे या तीन महिन्यांत सर्वाना पाणी मिळावे, या साठी पाण्याचे स्रोत शोधावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. ज्या जालना शहरात तीव्र दुष्काळ आहे, तेथे पाण्याच्या शुद्धीकरणाचे २२ पेक्षा अधिक कारखाने असल्याची माहिती दिल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, असे मोघम उत्तर दिले. वीजबिल माफ करावे, तसेच रोजगार हमी योजनेचा दर वाढवून द्यावा, अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देऊ, असे सांगत त्यांनी पत्रकार बैठक आटोपली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा