कबड्डी हा भारतीय खेळ आत्मसात करणाऱ्या थायलंडच्या खेळाडूंना आता खो-खो या दुसऱ्या भारतीय खेळाची मोहिनी पडली आहे. याचे दर्शनच इचलकरंजी येथे झालेल्या दोन प्रदर्शनीय सामन्यावेळी झाले. खो-खो खेळातील गतिमानता, लवचीकता, चित्तवेधक हालचाली, प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून होणारे आक्रमक डावपेच याची भुरळच थायलंडच्या खेळाडूंना पडली होती. त्याचे उत्स्फूर्त दर्शन पाहून थायलंडच्या खेळाडूंनी हा खेळ आपल्या भूमीत रूजविण्याचा मनोदयही व्यक्त करुन भारतीय खो-खो खेळाला एका अर्थाने सलामीच दिली.
थायलंड देशातील कबड्डी खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याच्या आठवडाभराच्या अभ्यास दौऱ्यावर तसेच सामने खेळण्यासाठी आले होते. हा दौरा संपल्यानंतर  त्यांना खो-खो हा भारतीय खेळ अवलोकन करण्याचे आवाहन संयोजकांनी केले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी थायलंडचे पुरुष व महिला कबड्डीपटू, त्यांचे प्रशिक्षक यांचा लवाजमा एका खास वाहनाने वस्त्रनगरीत दाखल झाला. प्रथम जयिहद मंडळ येथे खो-खो चा प्रदर्शनीय सामना पाहिला. पाठोपाठ डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मदानावर या खेळाचा चित्तथरारक अनुभव त्यांनी नजरेत सामावला. या सामन्यात सीआरएसएसयु ने १६ गुणांची कमाई करताना डायनॅमिक  स्पोर्टस् क्लबवर ४ गुणांनी विजय प्राप्त केला.
 खो-खो खेळातील गतिमानता व चापल्य याचा थायलंडच्या कबड्डी खेळाडूंवर इतका प्रभाव पडला की त्यांनी मनोगतात हा खेळ आपल्या मायभूमीत रुजविण्याची इच्छाच जाहीररीत्या प्रदíशत केली. केवळ प्रदर्शनी सामना पाहूनच थायलंडसारखे खेळाडू या खेळाला आत्मसात करु इच्छितात यातच या खेळाचे यश दडले असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या.
डायनॅमिक स्पोर्टसच्या मदानावर झालेल्या सामन्याचे उद्घाटन डिकेटीईच्या मानद सचिव सपना आवाडे यांनी केले. त्यांच्या हस्ते थायलंडचे कबड्डी खेळाचे प्रशिक्षक रमेश भेंडीगिरे, उमा भेंडीगिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, आयकोचे माजी अध्यक्ष सतिश डाळ्या, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, पाणी पुरवठा सभापती अब्राहम आवळे, भगवान पोवार, जवाहर पाटील, जयिहद मंडळाचे सचिव उदय चव्हाण, किरण होगाडे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. शेखर शहा यांनी केले. अहमद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. विजय गुरव यांनी आभार मानले. बाळू चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पंच म्हणून गणेश बरगाले, संतोष कुंडले, अमोल आडसुळे, प्रा. नाईकनवरे, संतोष जाधव यांनी काम पाहिले. दरम्यान, थायलंडच्या कबड्डी खेळाडू व प्रशिक्षकांनी इचलकरंजीच्या ऐतिहासिक व्यंकोबा कुस्ती आखाडय़ाला भेट दिली. तेथे कुस्तीचा सुरु असलेला सराव पाहून त्यांनी पलवानांशी चर्चा केली. प. अमृत भोसले व सहकार्यानी त्यांचे स्वागत केले.

Story img Loader