सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पदरी बाळगूनही यंदाच्या वर्षी जमा-खर्चाचे गणित जुळविताना अक्षरश: नाकीनऊ आलेल्या ठाणे महापालिकेने तब्बल १२ वर्षांनंतर स्वत:ची आर्थिक पत तपासण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून ती सावरण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, अशी ओरड गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होऊ लागली आहे. पुरेसा निधी हाती नसतानाही शेकडो कोटी रुपयांचे विकास कामांचे ओझे खांद्यावर वाहणाऱ्या महापालिकेने नाबार्ड, मुंबई महानगर विकास प्राधिकरण अशा संस्थांकडून कोटींच्या घरात कर्जाची उचल घेण्याची तयारी चालवली आहे. महापालिकेची खोलात चाललेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही र्कज मंजूर करताना संबंधित संस्था नाक मुरडू लागल्याचे विश्वसनीय वृत्त असून हे लक्षात घेऊन महापालिकेने स्वत:चे पतनिर्देशक मूल्यमापन (क्रेडिट रेटिंग) तपासण्याची तयारी सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा