कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी क्षेपणभूमीवर गेली सात वष्रे तेथील कचरावेचक मुलांसाठी शाळा चालविणाऱ्या विद्या धारप यांच्या कार्याची राज्य सरकारने दखल घेतली आहे. शासनाच्या वतीने जिल्हा स्तरावर दिला जाणारा आहिल्याबाई होळकर पुरस्कार धारप यांना जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कल्याणच्या धारावाडी क्षेपणभूमीजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील सव्वाशे कुटुंबीयांच्या वस्तीमध्ये लहान मुलांची मोठी संख्या आहे. कोणत्याही सुविधा नसलेल्या या भागातील मुलांबद्दलच्या शैक्षणिक घसरणीची माहिती या भागात काम करणाऱ्या अरुण देशपांडे यांनी विद्या धारप यांना दिली होती. या मुलांसाठी काहीतरी शैक्षणिक काम करा, अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यातूनच २००७मध्ये सेवानिवृत्ती घेतलेल्या विद्या धारप यांनी या भागातील शैक्षणिक कामाला सुरुवात केली. या शाळेला तेथील विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढला. अनेक अडचणींना तोंड देत धारप यांनी आपले हे कार्य सुरूच ठेवले.
हा पुरस्कार या मुलांवर संस्कार करण्याची घेतलेली जबाबदारी वाढवणारा आहे. २००७मध्ये अभ्यास वर्गाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या उपक्रमाची राज्य शासनाने घेतलेल्नावात बदल केला, तरीही सापडला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा