गेल्या अनेक वर्षांपासून लोकांतून मागणी होत असलेल्या शिरोळ ग्रामपंचायतीला आता नगरपरिषदेचा दर्जा मिळणार आहे. राज्यपालांनी याविषयी अधिसूचना काढली असून, यावरती हरकती मागविल्या आहेत.    
सुमारे ४५ हजार लोकसंख्या व तालुका ठिकाण असलेल्या या गावातील रस्ते, गटारे, शैक्षणिक व आरोग्यविषयकही विकास झालेला नाही. गावात भव्य असा कपिलेश्वर तलाव असतानाही याचा विकास झालेला नाही. एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल, अशी येथील भौगोलिक स्थिती असतानाही कामे झालेली नाहीत.  
तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता व श्रीक्षेत्र नृसिंहवाडी शेजारी असणाऱ्या गावाचा विकास होणे आवश्यक होते. परंतु तुटपुंज्या निधीमुळेच शिरोळ गावचा विकास झालेला नाही. यामुळे या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी लोकांतून होत होती. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ही मागणी जोर धरू लागली होती. लोकांच्या या मागणीचा पाठपुरावा करून शिरोळला नगरपरिषदेचा दर्जा मिळविण्यात काहीच अडचणी नाहीत. राज्याच्या राज्यपालांनी तशी ३१ ऑक्टोबर रोजी अधिसूचना काढली असून यासंदर्भात लोकांकडून हरकती मागविल्या आहेत. यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा