नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना वाचविण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यात तीन दुर्मिळ प्रजातींची गिधाडे आढळून आल्याने पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या ‘शोध पक्षांचा’ या मोहिमेंतर्गत दुर्मीळ व संकटग्रस्त प्रजातींचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ‘इजिप्शियन व्हल्चर’ या नामशेष होण्याच्या मार्गावरील गिधाडे आढळून आली. जवळपास दीड ते दोन दशकानंतर स्थानिक पातळीवर या गिधाडांचे अस्तित्व अधोरेखीत झाले आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे १ ऑक्टोबर ते ११ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत ही मोहिम राबविली जात आहे. जिल्ह्यातील जंगल, माळरान, विविध पानवठे या परिसरात ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर’ संस्थेने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुर्मीळ व संकटग्रस्त प्रजातींच्या पक्षांची गणना व नोंद करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या मोहिमेत राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, प्रसाद सोनवणे यांच्या चमुला ‘इजिप्तशियन व्हल्चर’या प्रजातीची तीन गिधाडे आढळून आली. ‘आययुसीएन’ संस्थेच्या लाल सूचीत या प्रजातीची दुर्मीळ व संकटग्रस्त अशी नोंद आहे. वास्तविक, मृत जनावरांचे भक्षण करणारा गिधाड निसर्गात स्वच्छक म्हणून भूमिका बजावते. यामुळे निसर्गाच्या अन्नसाखळीतील तो महत्वपूर्ण घटक मानला जातो. स्थानिक पातळीवर लांब चोचीचे व पांढऱ्या मानेच्या गिधाडांच्या प्रजाती आढळून येत असल्या तरी त्याही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नारळ किंवा तत्सम झाडावर अथवा डोंगरातील उंच कडेकपारीत त्यांचे वास्तव्य असते.
मध्यंतरी लांब चोचीच्या प्रजातींची दोन आणि इजिप्सिशीय प्रजातीची तीन अशा एकूण पाच गिधाडांची नोंद घेतली गेल्याने पक्षीमित्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पक्षी निरिक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी खास मोहिमही राबविली जात असल्याचे देवरे यांनी सांगितले. आतापर्यंतच्या निरीक्षणात बॅलन्सफेक, वॉटरकोक, रेलयुरोपियन रोव्हर, टाऊजी ईगल, मार्कहॅरियर, क्रिस्टलव्हाईट आयबीस आधी पक्षी आढळल्याचे संबंधितांकडून
सांगण्यात आले.
गिधाड नामशेष होण्याची कारणे
गिधाडांच्या संख्येत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ‘डायक्लोफिनेक’ औषधाचे अंश असणाऱ्या प्राण्याच्या मांसाचे भक्षण. हे औषध पाळीव प्राण्यांना वेदनाशामक म्हणून दिले जाते. उपचारादरम्यान त्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास आणि अशा मृत प्राण्याचे मांस गिधाडाने भक्षण केल्याने गिधाडाचाही मृत्यू होतो.
गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने आता या औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे.
जळगावमध्ये दुर्मीळ गिधाडांचे अस्तित्व
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांना वाचविण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच जळगाव जिल्ह्यात तीन दुर्मिळ प्रजातींची गिधा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-11-2013 at 07:27 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The existence of rare vulture in jalgaon