स्वामी विवेकानंदांचे विचार विश्वकल्याण साधणारे, राष्ट्र उन्नतीला प्राधान्य देणारे प्रेरक असेच होते त्यांनी कधीही चातुर्वण्र्य व्यवस्थेला महत्त्व दिले नाही. जात जन्माने ठरत नाही तर ती व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वानेच ठरते, यावर विवेकानंद ठाम होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ हिन्दी साहित्यिक नरेंद्र कोहली यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षांचे औचित्य साधून सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मदानावर आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात कोहली हे बोलत होते. भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ए. जी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर अर्ध शती समारोह समितीचे जिल्हाध्यक्ष धर्मराज काडादी, अॅड. शदर बनसोडे, पंचांगकत्रे मोहन दाते, ज्येष्ठ पत्रकार अरिवद जोशी, अरुण करमरकर, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात हणमंतराव गायकवाड यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आणि साहित्य वाचूनच आपणास नोकरीऐवजी उद्योग व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले. तरुण पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचा प्रारंभ सकाळी ग्रंथिदडीने झाला. संगमेश्वर महाविद्यालयासमोरील मदानावरून निघालेल्या या ग्रंथिदडीचा शुभारंभ कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रंथिदडी स्वामी विवेकानंदांची प्रतिमा असलेला रथ सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. ही ग्रंथिदडी विविध मार्गावरून फिरून हरिभाई देवकरण प्रशालेच्या मदानावर संमेलनस्थळी पोहोचली. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर स्वामी विवेकानंदांच्या साहित्य व विचारावर आधारित परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी शेकडो प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
 

Story img Loader