महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी ‘बेटी बचाव’ अभियान अधिक व्यापकतेने वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. शहरात लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात वाढ होत आहे याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या निर्देशानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘बेटी बचाव’ मोहिमेअंतर्गत दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी बेटी बचाव मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.
लिंग गुणोत्तराचे प्रमाण शहरात वाढत असले तरी मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करून तज्ज्ञांना बोलाविण्याची सूचना आयुक्तांनी केली. सोनोग्राफीद्वारे बाळाच्या जन्मापूर्वी लिंगाबाबतचे निदान करून सांगू नये. एवढी जरी काळजी घेतली मुलींची संख्या वाढण्यास मदत होऊ शकेल. यासाठी डॉक्टरांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पॉवर प्रेझेंटेशनद्वारे डॉ. भावना सोनकुसळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या उपक्रमात महापालिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. मंगला घिसाड यांनी दिले.  आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वर्षां ढवळे, महापालिकेच्या अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. यू.बी. नावाडे, गायनॉकॉलॉजिस्ट सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. मंगला घिसाड, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, वीणा खानोरकर, अशोक कोल्हटकर, डॉ. नमिता चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रदीप कुंभारे, कल्पना वानखेडे, मंजू शेवळे, सुनील भोयर समितीच्या झालेल्या बैठकीच्या वेळी उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा