वाशी खाडी पुलावरुन निर्माल्य टाकताना खिशातून पडणारा मोबाइल पकडताना तोल गेल्याने एक ४९ वर्षीय व्यक्ती खाडी पडल्याची घटना आज सकाळी पावणे नऊ वाजण्या सुमारास घडली. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या मच्छिमारांनी तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढल्याने त्यांचे प्राण बचावले.
पनवेल मध्ये राहणारे सुनिल सुरेंद्र सावंत (४९) टिळक नगर येथील रिलायन्स एनर्जीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कामावर जात असताना सावंत यांनी कार वाशी खाडी पुलावर थांबली. सोबत आणलेले निर्माल्य पुलावरुन खाडी टाकत असताना, त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल खाली पडला.
दरम्यान मोबाइल पकडण्यासाठी अधिक झुकल्याने त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. यावेळी त्यांच्या कारचालकाने आरडाओरडा केल्याने त्याठिकाणी असलेल्या मच्छिमारांचे लक्ष गेले. मच्छिमारांनी तातडीने होडीच्या साह्य़ाने त्यांना पाण्याबाहेर काढल्याचे वाशी पोलीसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा