संजय केळकरांचा दावा
शिक्षण क्षेत्रातही माफिया टोळ्यांचा शिरकाव झाला असून त्याचे ठोस पुरावे आपल्या हाती आले आहेत. येत्या आठवडाभरात मी ते चव्हाटय़ावर आणेन, असे प्रतिपादन माजी आमदार आणि भाजपचे विभागीय अध्यक्ष संजय केळकर यांनी रविवारी बदलापूर येथे केले. उच्च शिक्षण घेताना पर्यायांचा शोध घेताना योग्य सल्ला घ्या, अन्यथा पैसा आणि वर्ष वाया जाऊ शकते. अनेकांना याचा फटका बसला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
भाजपतर्फे बदलापूरमधील ४५० गुणवंत विद्यार्थ्यांचा केळकर यांच्या उपस्थितीत काटदरे सभागृहात सत्कार करण्यात आला. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नरेंद्र पवार, राम पातकर, राजेंद्र घोरपडे, उपनगराध्यक्षा वृषाली मेने आदी याप्रसंगी उपस्थित होते. यूपीएससी परीक्षेत देशात २३८वा क्रमांक पटकाविणारा संजय सुतार, वेटलिफ्टिंगमध्ये प्रावीण्य मिळविणारा संजय दाभोळकर, गजानन पुजारी (कला), देवेंद्र अधिकारी (नेटबॉल) यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.c
शिक्षण क्षेत्रातही माफियाराज
संजय केळकरांचा दावा शिक्षण क्षेत्रातही माफिया टोळ्यांचा शिरकाव झाला असून त्याचे ठोस पुरावे आपल्या हाती आले आहेत. येत्या आठवडाभरात मी ते चव्हाटय़ावर आणेन, असे प्रतिपादन
First published on: 26-06-2013 at 08:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is also mafiya in eduation side says sanjay kelkar