परदेशी युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिची अंतर्वस्त्र तसेच गाऊन स्वत:समवेत नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करताना वांद्रे पोलिसांनी पुरावा नष्ट केल्याचे कलमच अंतर्भूत केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला कमकुवत होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी मोहम्मद इस्माईल अन्सारी उर्फ बादशाह याला अटक करून पोलिसांनी बुधवारी वांद्रे न्यायालयात हजर केले. पोलिसांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आल्यामुळे त्याला ९ नोव्हेंबपर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. सदर परदेशी युवतीला मायदेशी परत जायचे आहे. त्याआधी ओळखपरेड होणे आवश्यक असल्यामुळेच पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. ओळखपरेड पूर्ण झाल्यानंतर त्याची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे.
गुन्हा घडल्यानंतर सदर युवतीने वांद्रे पोलीस ठाण्यात सुरुवातीला जबाब दिल्यानंतर तिला स्पॅनिश दुतावासात नेण्यात आले होते. तेथे तिचा स्वतंत्र जबाब नोंदविण्यात आला. या जबाबात फरक असल्याचे आढळून आले आहे. या जबाबानुसारच पोलिसांनी कलमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता बादशाहविरुद्ध चोरी, बेकायदा घरात प्रवेश करणे, बलात्कार यासह भारतीय दंड संहितेच्या ३७७ (अनैसर्गिक कृत्य) कलम लावण्यात आले आहे. मात्र त्याच्याविरुद्ध भारतीय पुरावा कायद्यातील २०१ अन्वये पुरावा नष्ट केल्याचे कलम लावण्यात न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा