* मोठय़ा वाहनांना सवलतीची खिरापत
* वाहतूक तज्ज्ञांनी हरकती नोंदविल्या
* रस्ते अडवून प्रश्न कसा सुटेल ?
ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या पार्किंगला अधिकृत दर्जा देत वाहनांना दर आकारणी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील वाहतूक तज्ज्ञांनी या धोरणाला विरोध करत महापालिकेकडे हरकती नोंदविण्यास सुरुवात केली असून रस्ते अडवून उभ्या करण्यात येणाऱ्या मोठय़ा वाहनांना पार्किंग दरात सवलत कशासाठी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पादचाऱ्यांचे हक्काचे पदपथ कापून रस्त्याचे रुंदीकरण करायचे आणि रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर पुन्हा गाडय़ा उभ्या करण्यास परवानगी द्यायची, हा दुटप्पीपणा असल्याची हरकत काहींनी महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नोंदवली आहे.
ठाणे महापालिकेने आखलेल्या पार्किंग धोरणानुसार शहरातील १७७ रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील गर्दीचे रस्ते, बाजारपेठा, तलाव, रेल्वे स्थानके या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनांच्या पाìकगला शिस्त निर्माण व्हावी यासाठी हे धोरण आखले गेले आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील वेगवेगळ्या संवर्गात विभागणी करण्यात आली असून त्यानुसार ठाण्यातील नौपाडा आणि उथळसर भागात रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करताना तुलनेने जास्त दर मोजावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या धोरणामुळे आपण तोंडघशी पडू अशी भीती वाटू लागल्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांनी वाहनांना आकारण्यात येणारे दर कमी करण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वाहन पाíकंगचे सुधारित दरांची आखणी केली आहे.
रस्त्यांच्या कडेला पार्किंग हवे कशाला?
ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या पार्किंगला अधिकृत दर्जा देत वाहनांना दर आकारणी करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2013 at 08:22 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There no need of parking near to road