नाटक करतोय, चला जाहिरात क्षेत्रात काय होतंय का हे पाहूया, असे म्हणत जयंत गाडेकर यांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्याच जाहिरातीने जयंत गाडेकर यांचा चेहरा घराघरात पोहोचला ती जाहिरात होती एअरटेलची. अब हर कोई ले सकता है, या कॅचलाइनने जयंत गाडेकर यांनी स्वत:चे स्थान या क्षेत्रात निर्माण केले.
चंद्रपूरहून मुंबईला केवळ सिनेक्षेत्रात काम करायला मिळेल या आशेने पाऊल ठेवले होते. पण इथे आल्यावर परिस्थिती वाटत होती तितकी सोपी नव्हती. मी सर्वप्रथम या क्षेत्रात येण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.
जाहिरात क्षेत्र हा ३० सेकंदांचा खेळ आहे. या खेळासाठी काही लाखो रुपये खर्च होत असतात. त्यामुळे एखाद्या पात्राची निवड करताना ते त्यांच्या उत्पादनाला साजेसेच पात्र निवडतात. त्याकरिता काही हजारोंमधून आपली निवड होत असते. मला सर्वात पहिली जाहिरात मिळाली ती एअरटेल या उत्पादनाची. या जाहिरातीमुळे माझा चेहरा घराघरात पोहोचला. परंतु त्यापुढेही मला काम मिळवण्यासाठी कष्ट करावे लागले होते. प्रत्येक ठिकाणी होकार मिळालाच असे नाही. तर अनेक ठिकाणी उत्पादनाला साजेसा चेहरा नाही म्हणून नाकारले गेले. या क्षेत्रातील निवडीची गणितं ठरलेली आहेत. त्यामुळेच इथे तुमचं काम मन लावून करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवलात व काम उत्तम केलंत तर इथे कामाची कमतरता नाही. शिवाय इथल्या कामाचे पैसेही उत्तम मिळतात. त्यामुळे आपली आर्थिक बाजूही भक्कम होते.
जयंतचा सल्ला
कुठल्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्राची र्सवकष माहिती मिळवा. केवळ छान आहे किंवा उत्तम पैसा आहे म्हणून या क्षेत्रात येऊ नका. आधी या क्षेत्राचा पूर्णपणे अभ्यास करा, मगच या क्षेत्रात या. काम करण्याच्या संधी खूप आहेत, पण योग्य ती संधी ओळखायला शिका.
जयंतने केलेल्या जाहिराती-
एअरटेल, मंच विराट कोहलीसमवेत, एल अॅण्ड टी इन्शुरन्स, पार्ले ट्वेंटी ट्वेंटी, नोकिया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा