भारतीय परिस्थितिकीय अर्थशास्त्र परिषदेचे सातवे द्विवार्षकि अधिवेशन ५ ते ८ डिसेंबर रोजी आसाममधील तेजपूर विद्यापीठात होणार आहे. या अधिवेशनास अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे. जागतिक बदल, परिसंस्था, चिरस्थायीत्व या विषयावर चर्चा होणार आहे.
 या अधिवेशनात ‘महाराष्ट्रातील १९७२ व २०१२च्या आवर्षणाचे साधन साक्षर आकलन व अन्वयार्थ’ यावर प्रा. देसरडा व अमेरिकेतील तज्ज्ञ मार्क िलडले यांनी एकत्रितपणे अभ्यास केलेल्या शोधनिबंधाचे वाचन होणार आहे. या शोधनिबंधात जलसंपत्ती विकासाचे पर्यायी प्रारूप सादर करण्यात आल्याचा दावा देसरडा यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी या अनुषंगाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या विषयावरील सादरीकरण करण्यात आले होते. त्या आधारे दुष्काळ निर्मूलन व जलसंपत्ती विकास केंद्र राज्यात स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचेही देसरडा यांनी सांगितले.

Story img Loader