सध्याच्या काळात लग्न जमणे आणि टिकणे कठीण झाले आहे. घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे. विवाहसंस्था टिकवून ठेवण्यासाठी ‘अनुरूप’ विवाहसंस्थेतर्फे ‘लग्नापूर्वी हे शिकायलाच हवं’ ही अभिनव कार्यशाळा रविवार २४ ऑगस्ट रोजी ठाण्यात होत आहे. ‘लोकसत्ता’ या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.
या कार्यशाळेत डॉ. शशांक सामक हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. नवविवाहितांचे कामजीवन याबाबत ते मार्गदर्शन करतील. तर डॉ. विद्या दामले या मुलींच्या प्रश्नांविषयी बोलतील.
गौरी कानिटकर संवादक असतील. तर अभिनेत्री समीरा गुजर आणि अमेय जोशी यांची मुलाखत हे कार्यशाळेचे आकर्षण असणार आहे.
लग्नाआधी पती-पत्नीमध्ये संवाद झाला तर विवाहानंतरच्या छोटय़ा-मोठय़ा वादातून टोकाची भांडणे होत नाहीत, याच भूमिकेतून ही कार्यशाळा होते. मुंबईलगत प्रथमच ठाण्यात ही कार्यशाळा होत असल्याचे गौरी कानिटकर यांनी सांगितले.
ही कार्यशाळा ठाण्यातील शुभमंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. नावनोंदणी आवश्यक आहे. संपर्क – ठाणे – सौ. शीतल जोशी (९८६७ ६२१ ८४१), डोंबिवली – सौ. अनु जोशी (०२५१-२४४ ९५ ०२/९८१९ २३३ ६५४).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा