एमआयडीसी परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरटय़ांनी तब्बल ५ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. काल (सोमवार) दुपारी ही घटना घडली.
एमआयडीसी जिमखान्याजवळील वसाहतीतील ज्योती राजेंद्र निकम यांच्या घरी ही चोरी झाली. मुलाच्या प्रवेशासाठी त्या काल दुपारी बंगल्याला कुलूप लावून गेल्या होत्या. दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी बंगल्याच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील ५ लाख ७८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. भरदिवसा ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक सावंत करीत आहेत.

Story img Loader